
यवतमाळ, दि. १८ – भरधाव ट्रक घरात शिरल्याने झालेल्या अपघातात महिला घटनास्थळीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ६.३० वाजता दरम्यान शहरालगत असलेल्या किन्ही येथे घडली. संगीता दामोधर गायधने रा. किन्ही असे मृत महिलेचे नाव आहे.
ट्रक क्रमांक एम.एच. ४४ / ८३०५ हा आर्णीकडून यवतमाळकडे जात होते. किन्हीगावात येताच ट्रकचालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या घरात शिरला. त्यावेळी संगीता गायधने ही महिला अंगणात सडा टाकत होती. ट्रकच्या जबर धडकेत महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर ट्रक हा शालेय पोषण आहारासाठी लागणारे खाद्यतेल यवतमाळकडे घेवून जात होता. ट्रक घरात शिरल्याने गायधने यांच्याघराची पडझड तर झालीच. शिवाय दुकाकी क्रमांक एमएच २९/ ७४३७ व बैलगाडीचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी केली. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घरात शिरलेला ट्रक के्रनच्या सहाय्याने बाहेर काढावा लागला. याप्रकरणी संजय देवराव गायधने (४०) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चालक मोतीराम संभाजी चाटे रा. परळी जि.बीड याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली. या घटनेमुळे किन्हीत हळहळ व्यक्त होत आहे.









