ट्रक चोरट्यांना भोपाळमध्ये अटक

54295ff9a2242
यवतमाळ, दि. २३ – बाभुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातुन सोयाबीन भरलेला ट्रक घुग्गुस फॅक्टरीत न पोहचविता घेवून पसार झालेल्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळमध्ये अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाभूळगाव बाजार समितीतून १२ डिसेंबर रोजी १६ हजार २०० क्विंटल सोयाबीन ट्रकमध्ये घुग्गुस येथे पाठविण्यात आले होते. मात्र मोहम्मद निसार इस्ताक शेख रा. तळेगाव, अकील हैदर मुस्ताक अली मोबीनपूरा नागपूर, सरबरजितसिंग सुरेखरसिंग रा. बºहाणपूर या तिघांनी संगणमत करून सोयाबीनचा ट्रक लंपास केला. व्यापारी अनिल जवेरीलाल खिवसरा यांना माल पोहचला नसल्याचा फोन आल्यानंतर त्यांनी बाभुळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांना या प्रकरणाचा सुगावा न लागल्याने प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पथकाने तपास सुरू केल्यानंतर आरोपी भोपाळ व नागपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक भोपाळला रवाना झाले होते. तेथून पोलिसांनी आरोपींना अटक करून सोयाबीन ट्रक, बनावट कागदपत्रे व बनावट नंबर प्लेट जप्त केली आहे. आज आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 × = ten