
डहाणू- डहाणूतील चारोटी नाक्यावर झालेल्या टँकर अपघातातील मृतांचा आकडा १० वर पोहचला आहे. गुजरातकडून मुंबईकडे निघालेला रिलायन्स कंपनीचा पेट्रोल टँकरचालकाचा ताबा सुटून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी नाक्यावर पलटी झाला. टॅँकर पलटी झाल्यानंतर जोरदार स्फोट झाला. यात टँकरचालकासह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १७ जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
ठाणे ग्रमिण रुग्णालयात दाखल केलेले अंजली बोभा (१४) आणि सुनिल उंबरसडा (३०) अशी त्यांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्यापही १३ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले ठाणे ग्रामिणचे पोलिस हवालदार भुषण शंके (३३) यांनी प्रसंगावधान राखून अनेकांचे जीव वाचवल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.









