‘ड’ जीवनसत्त्वामुळे कर्करोगावर करता येते मात

शरीराला जीवनसत्त्वे अत्यावश्यक आहेत. त्यामुळे रुग्णाची प्रकृती सुदृढ राहण्याबरोबरच विविध आजारांचा सामना करता येतो. कर्करोगावर मात करण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषत: स्तनांचा कर्करोग झालेल्या रुग्णांना ‘ड’ जीवनसत्त्व दिल्यास त्यांना ते फायदेशीर ठरू शकते, असे नव्या संशोधनात आढळले आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील कुटुंब आणि प्रतिबंधात्मक औषधे विभागाचे प्राध्यापक सेड्रिक गारलॅँड यांनी या विषयावर व्यापक संशोधन केले. ज्या स्त्रियांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असते त्यांना स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असते. शरीरातील ‘हायड्रोक्सीव्हिटॅमिन डी’ हे जीवनसत्त्व शरीरात निर्माण होते. त्याचा आणि स्तनांच्या कर्करोगाचा जवळचा संबंध आहे.गारलॅँड आणि त्यांच्या सहका-यांनी ‘२५ ‘हायड्रोक्सीव्हिटॅमिन डी’ वर तब्बल नऊ वर्षे व्यापक संशोधन केले. यासाठी त्यांनी स्तनांचा कर्करोग झालेल्या ४४४३ महिलांचा अभ्यास केला. ‘ड’ जीवनसत्त्वातील घटकांमुळे कर्करोगाची वाढ पूर्णपणे थांबते. त्यामुळे ‘डी’ जीवनसत्त्व असणारे रुग्ण कर्करोगाचा सामना अधिक चांगल्या रीतीने करू शकतात. महिलांच्या रक्तात प्रति मिलीलिटर ३० नॅनोग्रॅम्स ‘हायड्रोक्सीव्हिटॅमिन डी’ आढळते. तर स्तनांचा कर्करोग असलेल्या महिला रुग्णांच्या रक्तात या जीवनसत्त्वाचे प्रमाण १७ नॅनोग्रॅम्स मिलीलिटर आढळते.स्तनांच्या कर्करोगावर पारंपरिक पद्धतीने उपचार केल्यास तो फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी ‘डी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, असे मत यूसी डिएगोमधील असोसिएट प्राध्यापक हिथर हॉफिक यांनी व्यक्त केले.औषधांसोबतच ‘ड’ जीवनसत्त्वांचा डोस दिल्यास कर्करोगावर निश्चितपणे मात करता येते. हे संशोधन अँटी कॅन्सर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four − 4 =