
बीड – औरंगाबादकडे निघालेल्या तवेरा गाडीला गुरुवारी सकाळी नामलगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत अंबाजोगाईचे रहिवासी आहेत. तवेरागाडीने हे सर्व जण बीडमार्गे औरंगाबादला जात होते.
नामलगावजवळ भरधाव वेगात असलेल्या तवेराचा टायर पंक्चर झाला आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, तवेरातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर, दोघांनी उपचार सुरु असताना प्राण सोडला. पहाटे अंबेजोगाईवरुन हे सर्व जण औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. सय्यद सय्यल सलीम सय्यद अब्बास, सय्यद सुलताना सय्यद करीम, सनाज सय्यद सलीम, सय्यद मजहर सय्यद जानउल्लाह, सय्यद करीम सय्यद अली , सय्यद अलीशा सय्यद कलीम , शेख जेबीया शेख अजहरूद्दीन, सय्यद जुबीया सय्यद मुजीब यांचा या अपघातात मृत्यू झाला तर, सय्यद सादेक सय्यद सलीम आणि शेख अजहरूद्दीन शेख सत्तार हे दोघे जखमी झाले आहेत.









