‘ताज’वर शिया मुसलमानांचा दावा

images.jpeg11
आग्रा – बादशहा शहाजहानने जिच्यासाठी ताज महाल बांधला ती मुमताज शिया मुसलमान होती, असे सांगत उत्तर प्रदेशातील शिया पंथाच्या मुसलमानांनी ताज महालावर आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशचे औकाफ मंत्री आझम खान यांच्या वक्तव्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. ‘केंद्र सरकारने ताज महालाचा ताबा सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला द्यावा, अशी मागणी खान यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिया वक्फ बोर्डही सरसावले असून मुमताज महल ही शिया मुसलमान होती. त्यामुळे ताज ही शिया इमारत असल्याचा दावा शिया बोर्डाने केला आहे. शियांच्या मागणीच्या समर्थनार्थ लखनऊ येथील इमाम-ए-रझा कमिटीचे अध्यक्ष फय्यर हैदर यांनी काही मुद्दे मांडले आहेत.
हैदर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, यूपीचे मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांना पत्र लिहिले आहे. शिया धर्मगुरूंनीही कमिटीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ‘मुमताजचा पती बादशहा शहाजहाँ सुन्नी होता. त्याची कबर ताजमध्येच आहे, याचीही आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे किमान ताजचा अर्धा हिस्सा तरी शियांना मिळावा, असा मध्यममार्गही शिया धर्मगुरूंनी सुचविला आहे. ताजची जबाबदारी सध्या केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


one + = 3