ताज हॉटेलजवळ १६ जिवंत काडतुसं

gun-150x100
मुंबई- मुंबईतल्या ताज महाल हॉटेलजवळ आज दुपारी १६ जिवंत काडतुसं सापडल्यानं एकच खळबळ उडाली. ही काडतुसं नेमकी कुठून आली, हा घातपाताचा प्रयत्न होता का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. गेट वे ऑफ इंडिया इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी पेव्हर ब्लॉकच्या खाली दुपारी १२च्या सुमारास १६ जिवंत काडतुसं सापडली. ती ०.३२ बोअरच्या परवानाधारक रिव्हॉल्वरची असल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं. या काडतुसांची माहिती एका महिलेनं पोलिसांना दिली. ही काडतुसं कुलाबा पोलिसांनी जप्त केली असून ती कुणाच्या रिव्हॉल्वरची आहेत, याचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 5 = two