तासगावमधून आबांच्या पत्नीला उमेदवारी

2440_ncp3
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहाकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने या पोटनिवडणुकीत आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सुरुवातीपासूनच या जागेसाठी आर.आर.पाटील यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा होती. येत्या १७ मार्चला त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाराष्ट्राला आबा म्हणून परिचित असणारे आर.आर.पाटील यांचे मागच्या महिन्यात कर्करोगाने निधन झाले. सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहाकाळ हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.
ही निवडणूक बिनविरोध करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपाने उमेदवार न देण्याचे आणि निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight + 7 =