तिघींचा खून; अाराेपी पाेलिसांच्या ताब्यात

dbcl_akola_270315_blchikh
चिखली- विभक्त राहणारी पत्नी, मुलीसह सासूचा खून करणारा अाराेपी संताेष भाडाईतला अटक करण्यात पाेलिसांना यश अाले अाहे. त्याने २४ मार्चच्या मध्यरात्री अापल्या सासूरवाडीत येऊन चॅनलवर माेठ्या अावाजात गाणे लावून या तिघींचा खून केल्याची कबूली दिली अाहे.
चिखली तालुक्यातील सवणा येथे विमलबाई गाढवे, गीता संतोष भाडाईत आणि आरती भाडाईत या तिघींचा निर्घृण खून झाला हाेता. गीताचा नवरा व विमलबाईचा जावई संताेष यानेच हे खून केल्याचा पाेलिसांना संशय हाेता. दरम्यान, संताेष गावात आल्याचे समजताच पोलिसांनी शुक्रवारी दुपारी इसोली येथे त्याला अटक केली. दारूच्या आहारी गेलेल्या संतोषचे सासू विमलबाई यांच्याशी नेहमी खटके उडत होते. त्यातून त्याने घरातील लोखंडी फावड्याच्या दांड्याने सासू, पत्नी, मुलगी या तिघींनाही संपवून मुंबई गाठली होती. पत्नी व सासूला ठार मारल्यानंतर आपली मुलगी जोरजोराने रडत होती. त्यामुळे नाइलाजाने तिलाही ठार मारावे लागले. मात्र, मुलीला मारल्याचा आता पश्चाताप होतोय, असे संतोषने कबूली जबाबात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six + 2 =