तीन नगर पालिका विषय समितीची निवड, वणीत निवड बारगळली

IMG-20141219-WA0017
यवतमाळ : – नगर परिषदेचे राजकारण जिल्ह्याभोवती केंद्रीत असते. जिल्हा प्रशासन विभागाच्या वतीने निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार यवतमाळ, वणी, पुसद व दिग्रस या  राजकीयदृष्ट्या महत्वाच्या नगर पालिकेत विषय समिती सभापतीची निवड प्रक्रीया आज पार पडली. २० ला उमरखेड, घाटंजी, आर्णी, नेर या नगर पालिकेत विषय समित्यांची निवड करण्यात येणार आहे. तत्पुर्वी आज यवतमाळचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे हे आजच्या बैठकीत पिठासीन अधिकारी होते. तसेच मुख्याधिकारी रविंद्र पांढरे आणि प्रभारी मुख्याधिकारी दिपककुमार मीना यांच्या उपस्थितीत दुपारी यवतमाळ नगर  परिषदेच्या सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रीया पार पडली. यावेळी नगराध्यक्ष सुभाष राय प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी भाजप समर्थीत प्रणीता खडसे बांधकाम सभापती, भाजपाच्या रेखा कोठेकर शिक्षण सभापती,राष्ट्रवादीच्या सौ.अरूणा गावंडे आरोग्य सभापती, भाजपाच्या नंदा जिरापूरे नियोजन सभापती, मीना राहुल मसराम महिला व बालकल्याण सभापती म्हणून अविरोध निवडून आल्या. स्थायी समितीचे पदसिध्द अध्यक्ष नगराध्यक्ष असतात. उर्वरीत स्थायी समितीत नगरसेवक सुमित बाजोरीया, माजी सभापती प्रविण प्रजापती आणि राधिका बोरेले यांचा समावेश करण्यात आला. विषय समिती सभापतींची एसडीओ टापरे यांनी घोषणा करताच कार्यकत्र्यांनी एकच जल्लोष केला. सर्व महिला सभापती नगर परिषद इमारतीच्या खाली आवारात येताच ढोल ताशाच्या गजरात कार्यकत्र्यांनी आंनदोत्सव साजरा केला.
वणी नगर परिषदेत आज विषय समिती सभापतींची निवड प्रक्रीया ठरली होती. परंतु कोरम अभावी ही सभा बारगळली.
दिग्रसमध्ये नगर परिषदेत माजी मंत्री संजय देशमुख यांच्या परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. मात्र याच मतदार संघातून राज्याचे महसुल राज्यमंत्री म्हणून संजय राठोड नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे खास करून दिग्रस नगर पालिकेतील विषय समिती सभापती निवडीवर जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले होते. शिवसेनेकडून परिवर्तन आघाडीला शह दिला जातो का? यावरही काथ्याकुट चालु होता. परंतु सहा समितीच्या सभापती निवड प्रक्रीयेत काँग्रेस समर्थीत परिवर्तन विकास आघाडीच्या सत्ताधारी नगर सेवकांची एक मताने निवड झाली. दारव्ह्याचे एसडीओ मनोहर कडू हे पिठासिन अधिकारी होते. दुपारी १ ते ३ च्या दरम्यान मुख्याधिकारी विठ्ठल कुमरे यांनी नामांकन अर्ज स्विकारले. ठिक ३ वाजता निवड प्रक्रीयेला सुरूवात झाली. त्यानुसार बांधकाम सभापती पदी शाम शंकर महिंद्रे, शिक्षण सभापती पदी रामप्यारी, उत्तम नरके, आरोग्य सभापती पदी रामुजी सुवालाल पवार, पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती पदी नुरमहमंद खान, नियोजन सभापती पदी  डॉ.मुस्ताक प्यार मोहम्मद शेख, महिला व बालकल्याण सभापती पदी सलमाबी अ.मोहसीन व उपसभापती पदी शबाना परवीन सै.मतीन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडणुक प्रक्रीयेत शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक यांनी पाठ दाखविल्याने सत्ताधा:यांनी ठरल्याप्रमाणे निवड प्रक्रीया आटोपती घेतली. या सर्व नवनियुक्त सभापतींपुढे शहरातील विकासकामांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
पुसद नगर परिषदेत सभापतींचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे आज नविन विषय समितींच्या सभापतींची निवड करण्यात आली. पाणी पुरवठा सभापती म्हणून राजीव दुधे यांची पुन्हा निवड करण्यात आली. नगर परिषदेचे उपाध्यक्ष हेच नियोजन समितीचे सभापती असतात. बांधकाम सभापती पदी जाकी अन्वर, आरोग्य सभापती म्हणून अ‍ॅड.भरत जाधव, शिक्षण सभापती म्हणून प्रा.नामदेव फाटे आणि   बालकल्याण सभापती पदी मिराबाई साहु यांची अविरोध निवड करण्यात आली. एसडीओ जाजु आणि प्रभारी मुख्याधिकारी मानकर यांनी निवडीची ही घोषणा केली. त्यानंतर नगरसेवक आणि कार्यकत्र्यांनी उत्स्फुर्त जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three − = 2