तीन बस चालकात ‘फ्री-स्टाईल’

ST BUS2
बाभूळगाव, दि. १९ – बसमध्ये प्रवास करीत असलेल्या दोन बस चालक व गाडीचालवित असलेल्या चालकामध्ये वाद निर्माण  होऊन फ्रीस्टाईल झाली. गुरुवारी सायंकाळी ही घटना धामणगाव-यवतमाळ बसमध्ये खडकसावंगा फाट्याजवळ घडली.या प्रकाराने प्रवाशामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
यवतमाळ आगाराची बस (एम.एच. ४०/ एन ९२९८) धामणगाव वरून प्रवाश घेऊन यवतमाळकडे निघाली होती. यामध्ये देवगाव येथून रामबरम किसन पतालीया (३९) रा. राणी अमरावती, संभा महादेव अंजनकर (३९) रा. पिंप्री हे बाभूळगाव येथे जाण्यासाठी बसले. ते दोघेही चांदुर रेल्वे आगारामध्ये बसचालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान त्यांनी बस वाहकाशी विानाकारण वाद करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सदर बसवरील चालक रमेश रामकृष्ण ढाले (५२) रा. यवतमाळ यानी बस खडकसावंगा फाट्याजवळ थांबविली. दोन्ही बस चालकांना शांत राहण्यास सांगितले असता दोघेही ढाले याच्या अंगावर गेले. यावेळी एकाने बसमधील टामी काढून सदर चालकावर उगारली. वाद विकोपाला गेल्याने बस चालक ढाले यांनी सरळ बस बाभूळगाव पोलिस स्टेशनमध्ये लावली. बस चालक रमेश ढाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतालीया व अंजनकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ five = 8