तेजपालच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

पणजी – महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कोठडीत असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवण्यात आली आहे.
गोव्यात महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोवा पोलिसांनी तेजपालला अटक केली होती. तेजपालने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. तेजपालला आतापर्यंत दोन महिने पोलिस तसेच न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.सध्या  तेजपाल वास्को येथील साडा कोठडीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four × 3 =