तोतया पोलिसाने महिलेला अडीच लाखाने गंडविले

यवतमाळ –  देवदर्शन घेऊन घराकडे पायी जाणाºया वृध्द  महिलेला दोन तोतया पोलिसांनी गंडविल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजता महादेव मंदिराजवळ घडली. या महिलेची पोत, पाटल्या, अंगठी आदी अडीच लाखाचे दागिने घेऊन तेथून पळ काढला. या घटनेने खळबळ उडाली असून महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसंतीदेवी भुत (७२) रा. राजेंद्र नगर ह्या महादेव मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी नातवंडाने दुचाकीने या महिलेला तेथे आणून सोडून तेथून परत गेला. दर्शन झाल्यानंतर तेथून परत घराकडे जाण्यासाठी पायी निघाल्या. अशातच सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोन युवकांनी सदर महिलेला अडविले. आम्ही पोलीस असून शहरात भानगडी चालू असल्याने एवढे मोठे सोने कशाला घालता असे म्हटले. याचवेळी दुचाकीने आलेल्या एका व्यक्तीला अडवून त्यालाही पोलीस असल्याची बतावणी करून सोनसाखळी घेतली. त्यामुळे या महिलेने ६० ग्रॅमची पोत, ४० ग्रॅमच्या बांगड्या, ८ ग्रॅम अंगठी अन्य दागिने (किंमत २ लाख ५० हजार )काढून दिलेले दागिने एका कागदाच्या पुडीत ठेऊन हातचखालीने उडविले. त्यानंतर त्यामध्ये टप्पराचे कडे, व रिंग आढळल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी महिलेने शहर पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी, डी.बी. पथकाने घटनास्थळी भेट देऊन आरोपीची शोधमोहीम राबविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला. गत दोन महिन्यापूर्वी पोस्टल मैदानाजवळ मॉर्निंग वॉक करणाºया महिलेचे दागिने अशाच प्रकारे चोरुन नेले होते. या घटनेने खळबळ उडाली असून महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्तवाढवावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × = fifty four