‘त्या’पित्यावर खूनाचा गुन्हा

यवतमाळ –  सायतखर्डा येथे मुलीला गळफास लाऊन ठार मारल्याप्रकरणी पारवा पोलिसांनी पित्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला. अजय तुकाराम ढवळे (३५) रा. नाचनगाव जि. वर्धा याने अनुष्का (५) या मुलीचा गळा आवळून तीला ठार मारले होते. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वी सायतखर्डा येथे घडली होती. याप्रकरणी पारवा पोलिसांनी अजय  ढवळे याच्याविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× seven = 42