
यवतमाळ – जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून, पारा ८ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे.
डिसेंबर महिन्यात थंडीने चांगलाच कहर केला असून, पारा सातत्याने घसरत आहे. यंदाचे निचांकी तापमान जिल्हावासीयांना त्रस्त करीत आहे. लहान मुलं, वृद्ध व्यक्तींना सर्दी-पडसे, ताप आदी आजार बळावू लागल्याने डॉक्टरांची मात्र चांदी होत आहे. थंडीपासून उब मिळावी म्हणून ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दिवसभर गारवा कायम राहत आहे तर सकाळ, संध्याकाळ हुडहुडी भरत आहे. बदललेल्या वातावरणामुळे सूर्यदर्शन दुर्मिळ होत आहे. हिवाळ््याच्या सुरूवातीचा दीड महिना थंडीच्या प्रतीक्षेत गेला. मात्र डिसेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून सुरू झालेली थंडीची लाट कायम आहे.









