थर्टीफर्स्टवर पोलिसांचा ‘वॉच’

images
यवतमाळ , दि. ३० – नवर्षाला काही तास शिल्लक राहीले असून थर्टीफस्टच्या पार्श्वभूमिवर तरुणाईसह सर्वच जण सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागत करताना कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस दलाच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहे. थर्टीफर्स्टच्या पार्टीवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवनवर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपी चालकांना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवल्या जाणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री महामार्गासह शहरात व तालुक्यात महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी राहणार आहे. मद्यपी चालकांच्या तपासणीसाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली. मद्यपान करून कुणीही सुसाट वेगात वाहने चालवणार नाही. ट्रिपल सीट जाणार नाही, यावरही पोलीस लक्ष ठेवणार आहेत.
जिल्हाभरात अडीच हजार पोलीस कर्मचाºयांसह उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तैनात राहणार आहे. पोलिसांनी हॉटेल, वाईनबार मालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाईचा बडगा उगारल्या जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 + = four