दहशतवादी हल्ल्याची शक्यता

images
नवी दिल्ली,  दि. ८ (प्रतिनिधी)  मध्यप्रदेशच्या तुरुंगातून फरार झालेले पाच दहशतवादी पाकच्या ISI च्या मदतीने देशात हल्ले करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. हे पाचही दहशतवादी बंदी घातलेल्या सीमी संघटनेचे आहेत. हे दहशतवादी गेल्या वर्षी तुरुंगातून फरार झाले होते. एकूण सहा दहशतवादी तुरुंगातून फरार झाले होते. त्यापैकी एकाला पकडण्यात आलं आहे.
राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक हे या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ल्यांनी हादरलेल्या काश्मीरनंतर गुप्तचर यंत्रणेने आता देशाच्या इतर भागात दहशतवादी हल्ल्यांचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ one = 2