दाऊदला यायचे होते शरण

dawood (1)
नवी दिल्ली – १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला शरण यायचे होते असा खळबळजनक खुलासा सीबीआयचे माजी महानिरीक्षक नीरज कुमार यांनी केला आहे.
जून १९९४ मध्ये माझे दाऊदशी तीनवेळा बोलणे झाले. त्याच्या बोलण्यावरुन त्याला शरण यायचे हे जाणवत होते. मात्र जर भारतात परतलो तर त्याच्याविरोधातील गँगस्टर त्याला मारुन टाकतील अशी भिती दाऊदला होती. त्याची सुरक्षा ही सीबीआयची जबाबदारी असेल असेही मी त्याला सांगितले होते. मात्र सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी आपल्याला रोखले. त्यामुळे दाऊदशी पुढे बोलणे होऊ शकले नाही असे कुमार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितले.दाऊदचा निकटवर्तीय मनीष लालाने नीरज कुमार आणि दाऊदचे बोलणे करवून दिले होते. मनीषने मला सांगितले होते की दाऊद स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी शरण येत बोता असे नीरज कुमार म्हणाले. चार वर्षांनंतर छोटा राजनच्या गँगने मनीष लालाची गोळ्या घालून हत्या केली नीरज कुमार आपल्या पोलीस सेवेतील ३७ वर्षाच्या कारकिर्दीतल टॉप १० तपास प्रकरणांबाबतचे पुस्तक सध्या लिहीत आहेत. दाऊदसोबत झालेल्या संभाषणाचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे. लवकरच हे पुस्तक प्रदर्शित होणार आहे.मुंबईवर १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास नीरज कुमार करत होते. या बॉम्बस्फोटात २५७ जण ठार झाले तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 + = four