दिल्लीतून ३२ लाखांची रोकड तर ३४ हजार दारुच्या बाटल्या जप्त

index1

नवी दिल्ली – दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसा तसेच दारुचा महापूर दिल्लीत आला आहे. निवडणूक आयोगाच्या शोध पथकाने केलेल्या कारवाईत दिल्लीतून ३२ लाख रुपयांची रोकड आणि ३४ हजार दारुच्या बाटल्या जप्त केल्या.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकाने राज्यातून आतापर्यंत ३२ लाख २० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे तर विविध ठिकाणांहून तब्बल ३४ हजार ३२३ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

निवडणुकीदरम्यान होणा-या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकात निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभाग, सेवा कर, पोलीस आणि उत्पादक शुल्क विभागांतील अधिका-यांची नेमणूक केली आहे.

येत्या सात फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभेसाठी मतदान होत आहे. तर १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 1 = eight