दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार

delhi-assembly-election-2015
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापलेले आहे. सगळ्यांच पक्षांकडूनच आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक द्वंद सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धडाडणा-या या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे.
निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांतील मोठे नेते जोरदार प्रचार करत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जेजे कॉलनी येथे प्रचारसभा होणार आहे तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल मदनापूर खादर आणि सदार बझार येथे सभा घेणार आहेत. तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा रोडशोही होणार आहे.
२०१३ मध्ये ४९ दिवसांचे सरकार चालवल्यानंतर आम आदमी पक्ष पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. तर लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवणारा भाजपा विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीने तयारीत आहे. दिल्लीची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसनेही जोरदार तयारी केली आहे.
येत्या सात फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत आहे. तर १० फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 9 = seventy two