
नवी दिल्ली- दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारपैकी दोन आरोपींच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयने या दोघांच्या फाशीला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.
न्यायालयाने मुकेश आणि पवन गुप्ता या दोघांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. १३ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील चौघा आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीतील एका धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी मिळून निर्भयावर अत्यंत क्रूर पध्दतीने सामूहिक बलात्कार केला होता. यावेळी निर्भयासोबत असणा-या तिच्या मित्रालाही या सहाजणांनी बेदम मारहाण करुन त्या दोघांना रस्त्यावर फेकून दिले होते. गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा २९ डिसेंबर २०१२ रोजी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालय़ात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.या प्रकरणी सहापैकी एक अल्पवयीन आरोपी होता. त्याला तीनवर्षांची शिक्षा झाली. एकाने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्महत्या केली. सप्टेंबर २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने मुकेश (२६), आकाश ठाकूर (२८), पवन गुप्ता (१९), विनय शर्मा (२०) यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.









