दिवटे हल्ला प्रकरणी दोन अटकेत

यवतमाळ- माजी नगरसेवक प्रविण दिवटे याच्यावर प्राणघातक हल्ला करणाºया दोन आरोपीला टोळी विरोधी पथकाने आज दुपारी अटक केली. बबई उर्फ सुशिल गणेशप्रसाद दुबे रा. शारदा चौक, नितीन निगोट रा. विसावा सोसायटी पिंपळगाव अशी आरोपींची नावे आहे. तीन महिन्यापूर्वी मिलींद सोसायटीमध्ये गोळीबार करून  प्रवीण दिवटे याच्यावर  प्राणघातक हल्ला  केला होता. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी फरार होते. या घटनेला तीन महिने होऊन ही आरोपी फरार असून त्याना  त्वरीत अटक करा अशी मागणी दिवटेच्या पत्नीने पोलीस अधिक्षकांकडे  केली होती. त्यावरून पोलीस अधीक्षकांनी आरोपींना अटक करण्याची सुचना पथकाला दिली होती. दरम्यान आज टोळी विरोधी पथकाने शारदा चौक परिसरात बबई आणि नितीन या दोन आरोपीला अटक केली. उर्वरीत पाच आरोपी अजुनही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. ही कारवाई टोळी विरोधी पथकाचे निलेश ब्राम्हणे, सहा. पोलीस उपनिरीक्षक वसंत मडावी, सैय्यद साजीद , विकास खडसे, सुनील खंडागडे, शेखर वांढरे, बबलु चव्हाण, बबलु चंदन यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− three = 5