देविच्या कोपाने पतीच्या मृत्यूची भिती

महिलेने दागिने विकुण दिले होमहवणासाठी पैसे
यवतमाळ -देवीचा कोप होऊन घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू होऊ शकतो अशी भिती एका महिलेला ठगबाज युवकाने दाखविली. त्यामुळे पतीवर येणारे संकट टाळण्यासाठी महिलेने चक्क सोन्याचे दागिने विकुण होमहवण करण्यासाठी ५० हजार रुपये दिल्याचा धक्का दायक प्रकार सोमवारी  शहरातील अंबिकानगरात उघडकीस आला. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्तेनंतर राज्यात अंधश्रद्घा निर्मुलन विधेयक मंजूर झाले. तरीही पुरोगामी महाराष्टÑात अंधश्रध्देवर विश्वास ठेवून अशा प्रकाराला अनेकजण बळी पडतांना दिसत आहे.
प्रणय सुधाकर दुपारे (२३) रा. शिवाजी नगर भद्रावती जि. चंद्रपूर हा आई-वडीलासह शहरातील अंबिका नगर परिसरात भाड्याने राहत होता. रोजमजुरी करून त्यांचे कुटुंबीय उदनिर्वाह करीत होते. अशातच काही महिन्या अगोदर त्याचे आई-वडील भद्रावती येथील मुळ गावी परत गेले. शहरात मित्र मंडळी असल्याने व मन रमल्याने प्रणय हा येथून परत गेला नाही. तेंव्हापासून तो अंबिका नगरातील मानलेल्या मावशीच्या (जोत्सना बाबाराव रामटेके) घरी  भाड्याने राहत होता. कधी कधी त्यांच्याकडील कामे करून त्याने रामटेके कुटुंबियाचा विश्वास संपादन केला. दरम्यान काही दिवसापूर्वी त्याने देवीचा कोप होणार असून घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू होणार अशी भिती महिलेला दाखविली. सतत तो हीच भिती दाखवून घराची शांती करण्यासाठी होमहवन करावे लागते असे सांगत होता. त्यामुळे महिलेने पतीवर येणारे संकट टळावे म्हणून  १५ ग्रॅम सोन्याचे दागिने विकुन या युवकाला ५० हजार रुपये दिले. कुठलेही होमहवन न करता सदर रक्कम घेऊन युवकाने पोबारा केला. तर काही दिवसापासून भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी प्रणय दुपारे याच्याविरूद्घ भादंवि कलम  ४२०, ५०६ व  ६६(अ) माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे करीत आहे. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर  अंधश्रध्दा निर्मुलन विधेयकासाठी झटले. शेवटी दाभोळकरांच्या हत्येनंतर राज्य शासनाने सदर विधेयक मंजुर केले असून  अंमलबजावणी सुरु केली. तरीही पुरोगामी महाराष्टÑात अंधश्रद्घेला अनेक जण बळी पडत असून नागरिकांमध्ये जनजागृतीच करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + = eight