देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

dev
मुंबई – स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. आज, मंगळवारी विधानभवनात पार पडलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सूचना केली. तर माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले अशी माहिती नड्डा यांनी पत्रकारांनी दिली. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी या निवडीवर होकार दर्शवला असल्याचे नड्डा म्हणाले. या प्रक्रियेनंतर बैठकीत राजनाथ सिंह यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. आज, संध्याकाळी सव्वा सहा वाजता राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याचं तावडे यांनी सांगितले.
फडणवीस यांचा परिचय
मुंबई –  फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर जिल्ह्यात झाला. देवेंद्र फडणवीस यांनी एल.एल.बी., बिझनेस मॅनेजमेंट व डी.एस.ई तसंच बर्लिनमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विषयात पदविका प्राप्त केल्या आहेत.फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रने बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्रने घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’. पुढे हा मुलगा लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थाने जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचे. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले.
सलग दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांनी कमी वयातच नागपूरचे महापौरपद भूषवले. यानंतर १९९७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. नागपूरमधील दक्षिण – पश्चिम नागपूर मतदार संघातून ते निवडून येतात. विधानसभेत अभ्यासू नेते म्हणून प्रसिद्ध असलेले फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून समर्थपणे धूरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला यंदाच्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळाला.
फडणवीस यांनी नव्वदच्या दशकात राजकीय कारकि‍र्दीला प्रारंभ केला. राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. १९९२ आणि १९९७ साली ते दोन वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लहान वयात नागपूरचे महापौर पद भूषविले, सर्वात कमी वयाचे ते देशातील दुसरे महापौर होते.
विधानसभेसाठी १९९९ मध्ये नागपुरातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व ते आमदार झाले. सलग १३ वर्षे विधानसभेत असताना त्यांनी अंदाज समिती, गृह व नगरविकास खात्यांची स्थायी समिती, कायदा समिती ,सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम केले आहे. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 − three =