‘देशभक्त नथुराम गोडसे’वरील बंदीचा निर्णय २९ डिसेंबरला

naturam
मुंबई – ‘देशभक्त नथुराम गोडसे’ या चित्रपटाच्या बंदीविषयी न्यायालयीन कक्षा तपासण्यात येणार आहे. चित्रपटावर बंदी घालण्यात यावी की नाही, यासाठी न्यायालयीन कक्षा तपासण्याचे पुणे नगर न्यायालयाने ठरवले आहे. यासंबंधीचा निर्णय येत्या २९ डिसेंबर रोजी होणार आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या विरोधात ही याचिका असून हा चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी चित्रपट बंदीच्या मागणीसाठी पुणे न्यायालयात याचिका केली आहे. महात्मा गांधी हिंदूविरोधक आणि गोडसे देशभक्त असल्याचे चित्रीकरण चित्रपटात असल्याचे व्यक्तव्य महासभेचे सरचिटणीस मुन्ना कुमार शर्मा यांनी केले असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
याचिकेची सुनावणी घ्यावी की नाही, याबाबत न्यायकक्षा तपासण्यात येणार असल्याचे नगर न्यायाधीश एम. आय. मोडक यांनी सांगितले. त्यानंतरच याचिकाकर्त्यांना आपली बाजू मांडता येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, या याचिकेचा विषय पुणे न्यायालयाच्या कक्षेत येत असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील वाजिद खान यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबतचा निर्णय येत्या २९ डिसेंबर रोजीच्या सुनावणीत होणार आहे. महात्मा गांधी यांची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर ३० जानेवारी रोजीच चित्रपट प्रदर्शित करण्याचा महासभेचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three × = 6