
नवी दिल्ली- २०१३ मध्ये देशातील सुमारे १.३४ लाख लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य गृहमंत्री हरिभाई पराथीभाई चौधरी यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या असून त्याखालोखाल तामिळनाडूचा नंबर लागतो.
२०१३ मध्ये महाराष्ट्रात १६ हजार ६२२ आत्महत्येच्या प्रकरणाची नोंद झाली. तर तामिळनाडूमध्ये १६ हजार ६०१ प्रकरणांची नोंद झाल्याचे चौधरी यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
तसेच आंध्रप्रदेशमध्ये (१४ हजार ६०७), पश्चिम बंगाल (१३ हजार ५५), कर्नाटक (११ हजार २६६), मध्यप्रदेश (नऊ हजार ४४६) आत्महत्येच्या प्रकरणांची नोंद झाली.
२०१२ मध्ये देशात सुमारे एक लाख २५ हजार ४४५ आत्महत्येच्या प्रकरणांची नोंद झाली होती. २०११ मध्ये हेच प्रमाण एक लाख ३५ हजार ५८५ इतके होते.









