
यवतमाळ , दि. १२ ( प्रतिनिधी)- कारमधून अवैधपने देशी दारुची वाहतुक करणाºया एका आरोपीस जोडमोहा येथे अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकाºयाच्या पथकाने ही कार्यवाही केली असून देशीदारू व कार जप्त केली.
हरिभाऊ तुळशिराम नक्षणे (३९) रा. रुंझा असे आरोपीचे नाव आहे. एम.एच. २९/ ९९६० क्रमांकाच्या कारमधून जोडमोहा येथून रुंझाकडे देशी दारू नेत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिक्षक राहुल मदने याच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचुन जोडमोहा येथे सदर वाहन अडवून पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारुच्या १२ पेट्या आढळल्या. पोलिसांनी नक्षणे याना अटक करून कार व देशी दारू असा एकुण १ लाख २४ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक वसंता मडावी, जमादार राहुल मनवर, इकबाल शेख, संतोष मडावी, ऋतुराज मेंढवे यांनी केली.









