यवतमाळ : आर्णीवरून लोणबेहळ येथे जाणाºया दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डॉक्टरसह एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता लोणबेहळ येथे घडली. डॉ. दिपक गोपाल डुकरे (४५) रा. लक्ष्मीनगर पुसद, राजू देवराव खापरकर (३०) रा. आर्णी असे मृतकाचे नाव आहे. तर गजानन देवसिंग आडे (३२) रा. लोणबेहळ हा जखमी झाला असून त्याच्यावर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. डुकरे कार्यरत होते. मंगळवारी रात्री आर्णीवरून लोहणबेहळ येथे एम.एच. २९ / एए २२३० क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. अशातच गावापासून काही अंतरावरच अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातामध्ये डॉ. डुकरे, खापरकर हे ठार तर आडे हा जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतकार्य केले. शांतीलाल जयस्वाल यांनी अपघाताची माहिती आर्णी पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. अज्ञात वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
तसेच भरधाव ट्रॅक्टरने ढिगाºयाला धडक दिल्याने चालक खाली पडून चक्क्यात दबुन ठार झाल्याची घटना काल रात्री झाडगाव येथे घडली. भास्कर दत्तु तराडे (३०) रा. खडकी सुकळी असे मृतकाचे नाव आहे. तराडे हा ट्रॅक्टर घेऊन आपटी फाट्याकडून झाडगावकडे जात होता. अशातच स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची रेती ढिगाºयाला ठोस मारली. यावेळी चालक ट्रॅक्टरवरून खाली पडून मागील चाकात आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. रोशन चित्तरंजन कोल्हे (३२) रा. झाडगाव याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.









