यवतमाळ – पांढरकवडा येथून दुचाकीने यवतमाळकडे येणाºया वकीलासोबत वाद करून वाहन ढकलुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी न्यायालयाने दोन पोलीस कर्मचाºयांविरूद्घ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून दोन पोलीसांवर शहर ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल केले.
अॅड. गाझी इबादुल्ला सनाउल्ला खान (३० ) रा. मंगलपुर्ती ले आऊट पांढरकवडा हे ११ मार्च २०११ रोजी आपल्या गावावरून एम.एच. २९ / एस ४८८६ क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळकडे येत होते. अशातच सकाळी ९.३० वाजता पांढरकवडा मार्गावरील चौपाल सागर जवळ वाहतुक पोलीस शिपायी निवृत्ती तुळशीराम कुळसंगे (३८) व त्याचा अन्य एक साथीदाराने सदर वकीलाची दुचाकी अडवून त्याचेशी धक्काबुक्की करून जीवे मारण्याच्या उद्देशाने ढकलून दिले होते. यात तो जखमी झाला होता. याप्रकरणी तक्रार देऊनही पोलिसावर गुन्हा दाखल केला नव्हता. शेवटी खान याने न्यायालयात तक्रार दिली होती. अखेर या प्रकरणात न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले. त्यावरून कुळसंगे व त्याच्या साथीदारवर भादंवि ३०७, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.









