दोन शेतकºयांनी संपविली जीवनयात्रा

download
यवतमाळ , दि. २३ – सततच्या नापिकीला कंटाळून जिल्ह्यातील बाभूळगाव व उमरखेड तालुक्यातील दोन शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी तांबा येथे घडली. सोमेश्वर पुंडलीक वडे (५०) रा. तांबा असे मृतकाचे नाव आहे. तांबा शिवारात त्याची दोन एकर शेती होती. मध्यवर्ती बँकेचे व खासगी सावकाराचे तीन लाख रुपये कर्ज त्याच्यावर होते. यावर्षी खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी सोमेश्वर याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे नापिकीला कंटाळून शेतकºयाने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज घडली. मारोती फकीरा राठोड (४०), असे मृत शेतकºयाचे नाव आहे. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यात सर्वाधिक आत्महत्या निंगनूर येथील शेतकरी करीत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तहसीलदार सचिन शेजाळ यांनी नुकतीच समुपदेशन समिती स्थापन केली. त्यानंतरही आत्महत्येचे सत्र थांबत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
मारोती राठोड याने आज दुपारी १२ वाजता दरम्यान विषारी औषध प्राशन केले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी उमरखेड येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. सदर शेतकºयाच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलं व बराच मोठा आप्त परिवार आहे. भारतीय स्टेट बँकेचे ६० हजाराचे कर्ज असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. बिटरगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine × 1 =