धनगर आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

opssjhfjahj-310x232
विधानपरिषदेत आज (शुक्रवारी) धनगर आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देणं घटनाबाह्य आहे, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.
यापूर्वी सत्तेवर असणार्‍या सरकारने आरक्षण दिले असते तर, आता ही वेळच आली नसती, असे प्रत्युत्तर खडसे यांनी दिले आहे. मात्र, आता आरक्षण मिळवायला किती वेळ लागणार असून, हा प्रस्ताव केंद्राकडे कधी पाठवणार, अशा प्रश्नांनी विरोधकांनी सरकारला घेरलं. तसंच आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरूवात केल्यावर विरोधकांनी तांत्रिक मुद्दे काढत गोंधळ घातला. यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी आरक्षणासंदर्भात कालावधी निश्चत करण्याची सूचना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six − = 5