धारदार शस्त्राने युवकाचा खून

यवतमाळ – धारदार शस्त्राने युवकाचा खून करण्यात आल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजता दरम्यान शहरापासून काही अंतरावर असलेल्या आर्णी-घाटंजीबायपासवर घडली. विजय अमरनाथ उपाध्ये (३०)रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी असे मृताचे नाव आहे.
विजय हा फायनांन्स एजन्सी चालवित असून या व्यवसायीक वादातून चार जणांनी हा खून केल्याची चर्चा आहे. एक युवक रक्ताच्या थारोळ््यात बायपासवर पडून असल्याची माहिती चार्ली कमांडोला मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता विजय अखेरच्या घटका मोजत होता. चार्ली कमांडोंनी त्याना उपचारासाठी कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडगावरोड पोलिसांनी देखील शासकीय रुग्णालय गाठून संशयीत आरोपींचा शोध घेणे सुरू केले. वृत्त लिहिपर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 2 = eleven