नगराध्यक्षांच्याच कक्षात तोडफोड

15todfod21
हिंगोली : मागील चार दिवसांपासून पालिकेत चकरा मारत असलेल्या एकाने सोमवारी दुपारी नगराध्यक्षाच्या दालनात तोडफोड केली. रागाच्या भरात काचाचा टेबल व कुंडीचा चुराडा केल्याने एकच खळबळ उडाली.
प्रत्यक्षदश्रींनी सांगितल्यानुसार, हिंगोलीतील शेख युसूफ हा दुपारी मद्यप्राशन करून पालिकेत आला. आरडाओरडा केल्यानंतर त्याला कर्मचार्‍यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थेट नगराध्यक्षाच्या दालनात शिरला. तेथे कोणीही नसल्याने त्याने दालनातील काचेचा टेबल तोडला. त्यावरील रोपट्याची कुंडीही आदळली. परिणामी, दालनात खापराचे तुकडे विखुरले तर माती खाली पडली होती. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी माहिती देताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× eight = 40