नगर परिषद सभापतींनी पदभार स्विकारला

IMG-20141219-WA0017

यवतमाळ, दि. २६ – गेल्या दोन महिन्यापूर्वी न्यायालयात एका नगरसेकावने याचिका दाखल केल्यामूळे स्थायी समितीच्या निवड प्रक्रियेवर स्थगीती आली होती. न्यायालयाने आज गुरुवारी ही स्थगीती उठविल्यानंतर निवड झालेल्या सभापतींनी पदभार स्विकारला आहे.
नगर पालिकेतील कार्यरत सभापतींचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापती पदासाठी निवड प्रक्रिया सभागृहात राबविण्यात आली होती. यामध्ये बांधकाम सभापतीपदी प्रणिता खडसे, आरोग्य सभापती अरूणा गांवडे, महिला व बाल कल्याण सभापती मिना मसराम, नियोजन सभापती नंदा जिरापूरे, शिक्षण सभापती रेखा कोठेकर यांची अविरोध निवड करण्यात आली होती. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर या प्रक्रियेवर नगरसेवक हरीष पिल्ले यांनी आक्षेप घेऊन याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे सभापतीपदी निवड होऊनही नवनिर्वाचित सभापतींना पदभार स्विकारता आला नाही. दोन महिने न्यायालयीन लढाईत गेल्यानंतर आज न्यायालयाने निवड प्रक्रियेवरील स्थगिती उठविली. त्यामुळे निवड झालेल्या सभापतींनी आपआपला पदभार स्विकारला. यावेळी नगराध्यक्ष सुभाष राय व नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − one =