नववर्षाचे उत्साहात स्वागत

Hindu New Year on occation of Gudi Padawa in Dombivli

मुंबई- ढोलताशांचा गजर, सजवलेल्या पालख्या, दिंड्या, लेझिम पथके, मृदुंगाचा ताल, तुता-यांचा निनाद आणि विठुनामाचा गजर अशा मराठमोळ्या वातावरणात शोभा यात्रा काढून सोमवारी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. तसेच राज्यभर आनंदाची गुढी उभारुन या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

मराठी नूतनवर्ष गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या भव्य स्वागतयात्रांमुळे मुंबईसह ठाण्यातील अनेक भागात पारंपरिक आणि संस्कृतीचे दर्शन घडले. पुणे, नाशिक, नागपूरसह मुंबईत गिरगाव, दादर, बोरीवली आणि ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, वसई भागातही भव्य अशा स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले.डोंबिवलीत निघालेल्या भव्य यात्रेदरम्यान दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मदतनिधी गोळा करण्यात आला.गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मुलुंडच्या संभाजी मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांची दहा फुटांची रांगोळी काढण्यात आली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three × = 3