नातवानेच केला आजोबाचा खून

download (3)
यवतमाळ, दि. २७  – पूर्व वैमनस्यातून चुलत नातवानेच आजोबाचा खून केल्याची घटना डेहणी येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. लक्ष्मण अगलदरे रा. डेहणी असे मृतकाचे नाव असून, शंकर अगलदरे (३०) असे आरोपी नातवाचे नाव आहे.
पूर्व वैमनस्यातून बालाजी अगलदरे व शंकर अगलदरे यांच्यात नेहमीच खटके उडत होते. बालाजी यांचे वडील लक्ष्मण अगलदरे हे घराबाहेर बसून असताना, शंकर तेथून चालला होता. दरम्यान शंकरची नजर चाुलत आजोबाकडे केली. यावेळी त्याने शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला व रागाच्या भरात शंकरने लक्ष्मण यांच्या डोक्यावर काठीने वार केले. डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे पाहून शंकर घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी शेजारच्या नागरीकांनी रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या लक्ष्मण अगलदरे यांना उपचारार्थ यवतमाळ रुग्णालयात नेले. दरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत बालाजी अगलदरे यांनी आर्णी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी शंकरविरुद्घ खूनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 5 = thirty