नायजेरीयात दहशतवादी हल्ल्यात १२० ठार

Michelle Obama, Sasha Obama, Malia Obama, Bo Obama, Sunny Obama, Francis Botek
कानो – नायजेरीयातील कानो शहरातील एका मशिदीवर शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२० नागरीक ठार झाले असून, २७० जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारच्या नमाज पठणासाठी नागरीक मोठया संख्येने मशिदीत एकत्र जमले असताना, दोन आत्मघातकी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटामध्ये स्वत:ला उडवून घेतले त्याचवेळी तिथे आलेल्या अन्य दहशतवाद्यांनी नागरीकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
नायजेरीयातील वरिष्ठ धार्मिक नेते मोहोम्मद सानूसी दुसरे यांच्या राजवाडयाला लागून ही मशिद होती. मागच्या आठवडयात सानूसी यांनी नायजेरीयातील जनतेला बोको हरम या दहशतवादी संघटने विरोधात हातात शस्त्र उचलण्याचे आव्हान केले होते.
शुक्रवारी सकाळीच मैदगुरी शहरातील एका मशिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्याचा प्रयत्न उधळून लावला होता. आठवडयाच्या सुरुवातील नायजेरीयात दोन आत्मघातकी महिला दहशतवाद्यांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले होते. यात ४५ नागरीकांचा मृत्यू झाला होता. कानोमध्ये बहुसंख्य मुस्लिम लोकवस्ती असून, नायजेरीयातील हे मोठे शहर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four × 6 =