
नाशिक (पीटीआय) – नाशिकच्या मंगलवाडी झोपडपट्टीत एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार करणा-यांमध्ये मुलीचा भाऊ आणि काकाचाही समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
पिडीत मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा उचलून २७ एप्रिल आणि आठ मे ला चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आधी या मुलीला मारहाण करण्यात आली त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पिडित मुलीच्या आईचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. मुलीचे वडिल मजूर असून, ते कामावर गेल्यानंतर या चौघांनी बलात्कार केला.पिडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी मंगळवारी तिघा आरोपींना अटक केली. राजू दारुप्पा (२२), नरेश भंडारी (२२), प्रभाकर हरिजन (२२) अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही मगंलवाडी झोपडपट्टीतच रहातात. पोलिस मुलीच्या भावाचा राजु हुनमंता मालाला (२२) शोधत आहेत. पोलिसांनी आयपीसीच्या विविध कलमांखाली चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.









