
मुंबई – ‘या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे’ अशा तजेलदार शब्दांत जगण्याचे सूत्र मांडणारे ज्येष्ठ निसर्गकवी व गीतकार ना. धों. महानोर यांना शनिवारी अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये रंगलेल्या दिमाखदार ‘कोहिनूर मटा सन्मान’ सोहळ्यात जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘हा सन्मान तमाम शेतकऱ्यांचा आहे’ अशी कृतज्ञ भावना महानोर यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्यांच्या दाहक प्रश्नावर ‘आपुलकी’ या संस्थेच्या माध्यमातून अव्याहत काम करणारे अभिजित फाळके यांना ‘महाराष्ट्राचा यूथ आयकॉन २०१५’ या पुरस्काराने गेल्या वर्षीच्या ‘यूथ आयकॉन’ विजेत्या ऋजुता दिवेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले; तर अत्यंत प्रतिकूल परिस्थतिीशी झगडत आपली कला सातासमुद्रापार पोहोचवणारा तरुण प्रतिभावंत चित्रकार शशकिांत धोत्रे याला ‘कोहिनूर समुहा’चे एमडी उन्मेश जोशी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राचा कोहिनूर’ या पुरस्काराने सन्मानति करण्यात आले. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह व मानपत्र असे आहे.









