यवतमाळ, दि. २ – शहराला पाणीपूरवठा करणाºया निळोणा धरणावरून येणारी मुख्य पाईप लाईन फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा उद्या ३ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.
बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गोधणी रोडवरील विधी महाविद्यालयासमोरील निळोण्याची मुख्यपाईप लाईन फुटली. वनविभागाचे त्याठिकाणी खोदकाम सुरू केले. खोदकाम करतेवेळी सदर पाईप लाईन फुटली. दोन वाजता अधिकाºयांना हा प्रकार माहित झाल्यानंतर पंपीग बंद करण्यात आली. या दोन तासात लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला असून, काल नळाच्या प्रतिक्षेत नागरिकांनी रात्र जागून काढली. मात्र नळच न आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करून अधिकाºयांना फोन लावला. यावेळी पाईप लाईन फुटल्याचे समोर आले. दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून, पाईप लाईन जोडण्याकरिता कॉलरजाईन्डची गरज आहे. नागपूर व्यतिरीक्त जाईन्ड मिळत नसल्याचे सुत्राने सांगितले असून, आज दिवसभरातही काम पुर्ण न झाल्याने शहरात पाण्याचा ठणठणाट होता. दुरस्तीसाठी बराच अवधी लागणार असून, त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटंकती होणार आहे.
शहरातील व लगतच्या ग्राम पंचायतीमधिल गोधणी, पाटीपूरा, मेन मार्केट, अंबिकानगर, पेशवे प्लॉट, कळंब चौक, तायडेनगर, आठवडी बाजार, बेले ले-आऊट, चापनवाडी, सेवानगर, मेनलाईन, दत्त चौक, अमराई पुरा यासह अन्य काही नगरांचा काल बुधवारी व आज गुरुवारी नळाचा दिवस होता. पाईप लाईन दुरुस्तीनंतरच या भागांना पाणी पुरवठा करणे शक्य आहे. दर्डानगर व वाघापूर वासीयांना मात्र नो टेंशन असून, त्यांचा पाणी पुरवठा होणार आहे.









