
व्यापाºयास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यवतमाळ , दि. १२ – नेर शहरातील एका हार्डवेअर दुकानातून विना परवाना स्फोटके विकणाºया व्यापाºयास रंगेहात अटक केली. आज गुरूवारी यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मनोज टिकाचंद दर्डा (५०) रा. गांधी नगर नेर असे अटक केलेल्या व्यापाºयांचे नाव आहे. शहरात मिश्री मशिनरीज येथे अवैध स्फोटके विकल्या जात असल्याची गोपनीय माहीती यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून सापळा रचुन कॉरपेट विकत घेण्यासाठी बनावट ग्राहकाला पाठविण्यात आले. त्यावेळी दोन लोखंडी पत्राच्या पेटीमधून १२० किलो कारपेट स्फोटके आढळून आले असून ते जप्त करण्यात आले. त्यानंतर व्यापारी मनोज दर्डा यास पोलीसांनी अटक केली. आज येथील दिवाणी न्यायालयात सदर व्यापाºयास हजर करून एक दिवस पोलीस कोठडी मिळविली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून व्यापाºयाविरूद्घ गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, जमा. संजय दुबे, सचिन हुमने, आशिष चौबे, साजीद खान, सुरेंद्र वाकोडे यांनी केली.









