
मुझ्झफरनगर- मुझ्झफरनगर मधील नावला गावात एका सात वर्षाच्या चिमुरडीवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी अमित कुमार याला अटक करण्यात आली आहे.
अमित कुमार हा शेतात नोकर म्हणून काम करत होता. मानसुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नावला गावातून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आधिकारी डी. के. मित्तल यांनी दिली.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपीने आपल्या मुलीला घरातून पळवून शेजारच्या जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पिडीत मुलीच्या वडिलांनी केली.
पिडीत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









