पतीच्या खून प्रकरणी पत्नी व प्रियकराला आजन्म कारावास

images
यवतमाळ – जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया कृष्णापूर येथे पतीचा खून करणाºया पत्नीसह तीच्या प्रियकराला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.  पांढरकवडा येथील सत्र न्यायालयाचे तदर्थ अतिरीक्त सत्र न्यायालयाधिश एस.पी. डोरले यांनी आज शनिवारी हा निकाल दिला. शिला रविंद्र निब्रड, राजू मारोती वासेकर रा. कृष्णापूर ता. वणी अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे.
२२ फेबु्रवारी २०१३ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास पती रविंद्र उर्फ लघु निब्रड हा झोपून होता. यावेळी आरोपी पत्नी शिलाने त्याच्या तोंडावर उशी दाबुण धरली. तर तीचा प्रियकर राजूने त्याचे जवळील सुरीने  छाती व पोटावर वार करून खून केला होता. त्यानंतर मृतदेह अंगणातील फाटकाजवळ नेऊन टाकला व  रक्ताने माखलेली सुरी त्याच्या हातात ठेवून कोणीतरी मारून फेकल्याचा देखावा निर्माण केला. मात्र शिलाने शिरपूर पोलीस ठाणे गाठून माझ्या पत्नीचा खून केल्याचा जबानी रिपाट दिला. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, २०१,२०३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. दरम्यान पत्नी व तीच्या प्रियकराने रविंद्रचा खून केल्याची माहीती समोर आली. त्यावरून दोघांनाही अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी येथील सत्र न्यायालयाचे तदर्थ अतिरीक्त सत्र न्यायालयाधिश एस.पी. डोरले याच्या न्यायालयात पार पडली. यावेळी सरकारी पक्षातर्फे नऊ जणांच्या साक्ष तपासण्यात आल्या. त्यामध्ये मृतकचा मुलगा विशाल याची साक्ष महत्वाची ठरली. दोष सिद्घ झाल्याने भादंवि कलम ३०२ अंतर्गत आरोपी शिला व राजू या दोघानाही आजन्म कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महीने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर २०१, ३४ अंतर्गत तीन वर्ष सक्तमजुरी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महीने सक्तमजुरी आणि भादंवि २०३, ३४ अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 − six =