पतीनेच केला पत्नीचा खून, कमला आत्राम मृत्यू प्रकरण

पांढरकवडा – ११ दिवसापूर्वी ताडउमरी शिवारातील मृतदेह आढळलेल्या महिलेच्या खूनाचा उलगडा झाला. दारुपिऊन विवस्त्र नाचत असल्याने पतीनेच तीचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
रामदास आत्राम रा. शाम नगर असे आरोपीचे नाव आहे. ताडउमरी शिवारात पटेल यांच्या शेतात  कमला रामदास आत्राम या महिलेचा मृतदेह २१ फेबु्रवारी रोजी आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. महिलेचा मृत्यूबाबत शहरात उलट सुलट चर्चेला उधान आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. अशातच कमलाचा खून तीच्या पतीनेच केल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची शोधमोहीम सुरु केली. दरम्यान काल रात्री  रामदासला अटक केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. १६ फेबु्रवारी रोजी रामदासने घरी मटन आणून दिले व बाहेर गेला. काही तासानंतर घरी परत येताच पत्नी कमला ही दारुच्या नशेत विवस्त्र नाचत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राग अनावर झाल्याने लाथा बुक्कयाने मारहाण केल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच आरोपीने तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर दुसºया दिवशी मृतदेह खांद्यावर घेऊन ताडउमरी शिवारातील पटेल यांच्या शेतात फेकुन विल्हेवाट लावल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्या मागर्दशनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राखी गेडाम यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six − = 5