पत्नी व मुलाने केला इसमाचा खून

download
यवतमाळ, दि. २४ (रवी चरडे) – कौटुंबिक वादातून पत्नी व मुलानेच दगडाने ठेचून इसमाचा खून केला. शनिवारी रात्री ८ वाजता दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे ही घटना घडली. याप्रकरणी लाडखेड पोलिसांनी आरोपी पत्नी व मुलास अटक केली आहे.
प्रकाश बाबराव फरकाडे (४८) रा. पाभळ असे मृतकाचे नाव आहे. तर यमुना प्रकाश फरकडे (४०), गजानन प्रकाश फरकडे (१८) अशी आरोपींची नावे आहे. मृतक व आरोपींमध्ये सतत वाद होत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्रीही त्याच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने पत्नी यमुना व मुलगा गजानन याने दगडाने ठेचून प्रकाशला जागीच ठार केले. याप्रकरणी मृतकाची आई धु्रपदा बाबाराव फरकाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून तपास ठाणेदार क्षिरसागर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 − = three