नेर – येथे राष्ट्रीय महाराष्ट्र पत्रकार संघाचे वतीने ६ जानेवारी रोजी मंगळवारला पत्रकार दिनाचे औचित्य साधुन स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर व वादविवाद स्पर्धेचे आयोजन स्वागत मंगल कार्यालय येथे केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पवन जयस्वाल हे राहणार आहे. उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल हे राहणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमतचे कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, राष्टÑीय मराठी पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष तथा परिवर्तन समाचारचे आवृत्ती संपादक संदीप खडेकर, नेहरू शिक्षण संस्थेच अध्यक्ष परमानंद अग्रवाल उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला मार्गदर्शन महणून प्रा. संजय नाथे, अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना मराडे, उपजिल्हाधिकारी संदीप कुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, ठाणेदार गणेश भावसार, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता पवार, पोलिस उपनिरीक्षक डॉ. रंगनाथ जगताप इत्यादी मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
कार्यक्रमाचे दुसºया सत्रात वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘वाढत्या भ्रष्टाचाराला जनता तारक की मारक’ हा वादविवाद स्पर्धेचा विषय आहे. स्पर्धेतील विजयी स्पर्धकाला प्रथम बक्षीस ३,००१ रुपये, द्वितीय बक्षीस २,००१ रुपये तर तृतीय बक्षीस १,००१ रुपये ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप खडेकर तर उद्घाटक म्हणून दैनिक हिंदुस्थानचे आवृत्ती संपादक नागेश गोरख हे उपस्थित राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र माहूरे, श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पखाले, झी २४ तासचे जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत, गटविकास अधिकारी गौतम भगत, दै. पुण्य नगरीचे उपसंपादक तथा महाराष्टÑ न्युज नेटवर्कचे संपादक राहुल वासनिक, भाजपाचे तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम लाहोटी, नगरसेवक भाऊराव ढवळे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन काळे, अविनाश बन्सोड, मिना सावळकर, जेष्ठ पत्रकार नारायण वंजारी, दै. दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी नितीन भागवत, नगरसेवक संजय दारव्हटकर, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे बंडू बोरकर, नगर परिषदचे बांधकाम सभापती शालीक गुल्हाणे, नगरसेविका अॅड. रश्मी पेटकर, भाजपाचे जिल्हा सचिव राजेंद्र देऊळकर, वैष्णवी गुल्हाणे, पंचायत समिती सभापती भरत मसराम, वसंत महल्ले, प्रा. शांतरक्षीत गावंडे इत्यादी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन काळे, कार्याध्यक्ष अरूण राऊत, सचिव किशोर वंजारी, उपाध्यक्ष अशोक इसाळकर, कोषाध्यक्ष संजय राऊत, संघटक प्रवीण पाटमासे, संघटक विनोद कापसे, मार्गदर्शक प्रा. सदाशिव जरोटे, पांडूरंग भोयर, रमेश दिक्षीत, नदिम खान, निलेश वंजारी, वसीम शेख, बिस्मिला पठाण, अमीन पठाण, राहुल सोहर यानी केले आहे.










