पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार एअर चीफ मार्शल मुळगावकर यांचे निधन

Chief-Marshal-Moolgaonkar
पुणे – माजी एअर चीफ मार्शल ह्रषिकेश मुळगावकर यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. पुणे येथील कमांड रुग्णालयात त्यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते, २९ मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
ह्रषिकेश माळगावकर यांना १९४७ साली स्वतंत्र दिनादिवशी हवाई दलाच्या सलामीचे नेतृत्व करण्याचा सन्मान मिळाला होता. सन १९७६ साली त्यांची मुख्य एअर मार्शलपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १९७८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले असून त्यांनी ३८ वर्षे हवाई दलाची सेवा केली.दरम्यान मुळगावकर हे उत्तम विमानचालक होते. त्यांनी हवाई दलातील ६७ प्रकारची विविध विमाने चालवली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − = three