
पांढरकवडा, दि. १६ – तालुक्यात रविवारी रात्री दरम्यान वादळी वाºयासह आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचा सफाया झाला. वादळाच्या तडाख्यात तहसील कार्यालयाचे छत उडून गेले. अवकाळी पावसाच्या तांडवामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक गावातील वृक्ष उन्मळून पडली. या तडाख्यात विजेचे पोल वाकून ताºया तुटल्याने वीज गुल झाली होती. संकटाच्या वेळी मदत करणाºया तहसील कार्यालयाचे छत उडून गेल्याने महत्वाचे कागदपत्र पावसाच्या पाण्याने ओली झाली. संगणकही खराब झाले. तहसीलचे सहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. आधीच कोरड्या दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे पार कंबरडेच मोडून गेले आहे. हाता तोंडाशी आलेला रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पीक मातीमोल झाले आहे. महसूल प्रशासनाने तत्काळ सव्हेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









