पाणी, दुष्काळावर नासा-इस्त्रोचा एकत्रित अभ्यास

3
वॉशिंग्टन – पाणी आणि दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो एकत्रितपणे उपग्रहांची मालिका प्रक्षेपित करणार आहे. नासाने ही माहिती दिली आहे.
पृथ्वीवरील पाणी आणि दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी पुढल्या सात वर्षात वेगवेगळे उपग्रह अवकाशात पाठविण्याची नासा आणि इस्त्रोची योजना आहे. पृथ्वीवर होणा-या महत्वाच्या बदलांवर नासाचे जमीन, हवा आणि अवकाशातून लक्ष असते. पृथ्वीवरील वातावरणात होणा-या बदलांचा अभ्यास करण्यासाठी नासाने काही नवीन पध्दती विकसित केल्या आहेत.वेगवेगळया प्रयोगातून उपग्रहांकडून जमा होणारी महत्वपूर्ण माहिती नासा नेहमीच जागतिक समुदाय तसेच विविध संस्थांना देत असते. जेणेकरुन पृथ्वीच्या सुरक्षिततेविषयी जागृती होईल आणि विविध उपायोजना करता येतील. पृथ्वी विज्ञान मोहिमेतंर्गत यावर्षी तीन उपग्रह प्रक्षेपित करण्याची नासाची योजना आहे. या उपग्रहांव्दारे पृथ्वीवरील पाण्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine + = 15