पालकमंत्री राठोडांनी केली बसस्थानकाची सफाई

ST station-3
यवतमाळ, दि. १८ – यवतमाळ बसस्थानकावर अचानक सकाळी उपस्थित होऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी हातात झाडू घेवून साफसफाई केली. जनजागृती समितीच्यावतीने दर रविवारी बसस्थानकावर सफाई मोहीम राबविण्यात येते. त्या मोहिमेत पालकमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन सहभाग घेतला.
यावेळी आ.मदन येरावार, जनजागृती समितीचे अजय मुंधडा, मनोज औदार्य, विनोद आरेवार, निलास झेंडेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी परिसराची पाहणी केली. त्यानंतर सफाई मोहिमेत भाग घेतला. परिसरातील कचरा गोळा करून मोहिमेचे त्यांनी कौतून केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्र्यांनी प्रत्येकाने स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले. अस्वच्छतेमुळे अनेक आजार पसरतात. शासनाने स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहे. प्रत्येकाने त्यात सहभागी होण्यासोबतच या सामाजिक कार्यात हातभार लावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथसुध्दा दिली. आमदार मदन येरावार यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 × five =